प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

ना.पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक सेवा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन 

परळी वैजनाथ,।दिनांक २१। 

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल, पशुसंवर्धन, मंत्री तथा जालना जिल्ह्ययाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे या जनसेवेचा वसा आणि वारसा चालवत आहेत. निस्वार्थ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे पंकजा मुंडे यांचे नेतृत्व फुलत असुन आगामी आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे होऊन जिल्हा सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी आज केले. 

        ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसा निमित २१ ते २६ जुलै दरम्यान शहरात शहर भाजपच्या वतीने सामाजिक सेवा सप्ताह राबविण्यात येत असून या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे उदघाटन आज तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ना. पंकजा मुंडे यांच्या अरुणोदय मार्केट मधील संपर्क कार्यालयात झालेल्या या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राज्य परिषद सदस्य सतीश मुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीराम मुंडे, भाजपाच्या शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे, दीनदयाळ बॅंकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर देशमुख, भाजयुमोचे प्रदेश चिटणीस.अ‍ॅड. अरुण पाठक यांची उपस्थिती होती. 

       यावेळी सतीश मुंडे, श्रीराम मुंडे, निळकंठ चाटे, डॉ. शालिनीताई कराड, अ‍ॅड. अरुण पाठक यांनी ना. पंकजा मुंडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचलन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले. दरम्यान आज आज आधार कार्ड अपडेट, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 घरकुल नोंदणी, बारा बलुतेदार विश्वकर्मा योजना नोंदणी, ऊसतोड मजुर महिलांची रोगनिदान तपासणी आदी उपक्रम घेण्यात आले. यात नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.

मंगळवारचे उपक्रम

     मंगळवार दि. २२ - रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत पंकजाताई यांचे संपर्क कार्यालय, बोधीवृक्ष वृक्षारोपण स.९.३० वा. स्थळ : भिमवाडी, स.१०.३० वा. स्थळ : हनुमान नगर. तर उद्या बुधवार दि. २३ जुलै - सकाळी ९ वा. छत्री वाटप व कापडी पिशवी वाटप, सकाळी ११ वा., वह्या वाटप स.११.३० वा. माध्य. आश्रम शाळा, शिवाजी नगर,  व१२ वा. विलाल उर्दू प्रा. शाळा, हमालवाडी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट