अखेर वैद्यनाथ बँकेची निवडणूक लागलीच !
वैद्यनाथ बँक निवडणूक: चार जागा बिनविरोध; सर्वसाधारण मतदारसंघ आणि भटक्या विमुक्त जा. मतदार संघासाठी होणार निवडणूक
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
मराठवाड्यातील अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेची निवडणूक बिनविरोध होईल असे शेवटच्या क्षणापर्यंत वाटत असताना आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर वैद्यनाथ बँकेची निवडणूकच लागली आहे. एकूण 17 जागांसाठीच्या या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघातील चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. मात्र प्रतिष्ठेच्या सर्वसाधारण मतदारसंघातील बारा जागेसाठी 14 अर्ज कायम राहिले. त्यामुळे या मतदारसंघासाठी निवडणूक अटळ आहे तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या मतदारसंघातून निवडावयाच्या एका जागेसाठी दोन अर्ज कायम राहिल्याने या मतदारसंघासाठीही निवडणूक अटळ झाली आहे.
महिला प्रवर्गासाठीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असुन यामध्ये माजी खासदार व विद्यमान संचालक डॉ. प्रीतम मुंडे आणि सौ. माधुरी योगेश मेनकुदळे यांची बिनविरोध निवड झाली. अनुसूचित जाती मतदारसंघासाठीच्या एका जागेवर प्रा. विनोद जगतकर यांची बिनविरोध निवड झाली. तर इतर मागासवर्गीय मतदार संघातील एका जागेसाठी अनिल दिगंबरराव तांदळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकंदरीत आता सर्वसाधारण मतदारसंघासाठीच्या 12 जागेसाठी 14 अर्ज तर भटक्या विमुक्त जाती मतदारसंघासाठीच्या एका जागेसाठी दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत. या दोन मतदारसंघातील एकूण 13 जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया होणार आहे. 10 ऑगस्ट रोजी या निवडणुकीची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
वैद्यनाथ बँक निवडणूक-2025
सर्वसाधारण मतदारसंघातील 12 जागेसाठी 14 उमेदवार
1.लाहोटी संदीप सत्यनारायण
2.जोशी प्रकाश रंगनाथराव
3.देशपांडे प्रविण भाउसाहेब
4.निर्मळे महेश्वर शिवशंकर
5.लोमटे सुशांत शरदराव
6.वाकेकर विजय सुवालाल
7.कलंत्री मनमोहन चंदुलालजी
8.डुबे अमोल विकासराव
9.जैन कुलभूषण शांतिलालजी
10.सामत विनोद अशोक
11.शिंदे बाबासाहेब शंकर
12.धमपलवार वैजनाथ नागनाथ
13.लोमटे राजेंद्र भगवानराव
14.मुंडे राजाराम लक्ष्मण
भटक्या विमुक्त जा.ज. मतदारसंघ
15. फड राजाभाऊ श्रीराम
16. कराड रमेश शेषेराव
महिला प्रतिनिधी : दोनही जागाबिनविरोध
17.मेनकुदळे माधुरी योगेश
18. मुंडे प्रितम गोपीनाथराव
इतर मागासवर्गीय एक जागा बिनविरोध
19. तांदळे अनिल दिगंबर
अनुसुचित जाती एक जागा बिनविरोध
20. जगतकर विनोद गणपतराव
-------------------------------------
एकूण बिनविरोध जागा : 4
--------------------------------------
निवडणूक होणार या जागांसाठी>>>
12 जागा सर्वसाधारण : 14 उमेदवार
1 जागा भटक्या विमुक्त जा.ज.:2उमेद्वार
-------------------------------------
एकूण 13 जागेसाठी निवडणूक
-------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा