इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

आ.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त उपक्रम.....!!!!

 मिलिंद विद्यालयात 'शालेय क्रिडा व सांस्कृतिक सप्ताहाची' प्रा.डाॅ.यल्लावाड यांच्या मार्गदर्शनाने सांगता

 परळी वै.(प्रतिनिधी):नाथ शिक्षण संस्था संचलित, मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज,परळी वै.येथे संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार .धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त; संस्थेच्या सचिव सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे व सहसचिव प्रदिप खाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 'शालेय क्रिडा व  सांस्कृतिक सप्ताहाचा' प्रा.डाॅक्टर राजकुमार यल्लावाड सर यांच्या मार्गदर्शनाने व बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.


धनंजयजी मुंडे  यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमास अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदरकर बी.जी. , प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डाॅ.राजकुमार यल्लावाड, मिलिंद ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री.शिंदे व्ही.एन.,उप-प्राचार्य श्री.इरफान शेख, वृक्षमित्र श्री.सुनील आदोडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थितीत होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थितीत मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी प्राध्यापक डाॅक्टर राजकुमार यल्लावाड सर यांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांस मोलाचे मार्गदर्शन केले.

धनंजयजी मुंडे  यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात दिनांक १५  जुलै ते २२ जुलै पर्यंत घेण्यात आलेल्या विविध सहशालेय उपक्रमात सहभागी झालेल्या व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला.


शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदरकर बी.जी.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अध्यक्षीय समारोप केले.


कार्यक्रमास व मिलिंद माध्यमिक विद्यालयातील व मिलिंद ज्युनियर काॅलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे संचालन शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळे सर यांनी केले तर आभार दराडे आर.डी. यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट