पं.यादवराज फड यांना स्वरब्रह्म पुरस्कार जाहिर 


अंबाजोगाई :  तालुक्यातील वरवटी येथील पंडित यादवराज फड यांना स्वरब्रह्म संगीत पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वरब्रह्म कला अकादमीच्या वतीने घेण्यात येणारा यंदाचा स्वरब्रह्म संगीत महोत्सव धायरी,पुणे येथे  होणार आहे. या महोत्सवात स्वरब्रह्म कला अकादमीच्या पन्नासहून अधिक विद्यार्थी कलाकार आपले गायन - वादन सादर करणार आहेत. यानिमित्ताने किराणा घराण्याचे जेष्ठ गायक व संगीतकार पं. यादवराज फड, जेष्ठ किर्तनकार व गायक-वादक ह.भ.प.भास्कर महाराज सानप, नाना पानसे घराण्याचे युवा पखावज वादक कृष्णा साळुंके व युवा गायक गोविंद कांबळे यांना स्वरब्रह्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.11 हजार रू. रोख,सन्मानचिन्ह ,शाल   श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.पं. यादवराज फड यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होणार असुन रसिक, कलाकार व मान्यवर मंडळी या महोत्सवास उपस्थित राहणार आहेत. धायरी येथील कै.बंडोजी खंडोजी चव्हाण हायस्कुल सभागृह येथे रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत महोत्सव संपन्न होणार असुन पुणे व परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना उपस्थित रहाण्याचे अवहान स्वरब्रह्म कला अकादमीचे अध्यक्ष गायक शिवाजी चामनर , संचालिका शिवकांता चामनर, विद्यार्थी प्रतिनिधी मेघा चव्हाण व महेश माने तसेच संपर्क प्रमुख लक्ष्मण सावंत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार