मजास इनामदार यांच्या प्रयत्नाने रेणुका चौक ते ट्रॅक रस्त्यावर पथदिवे बसविले
परळी (प्रतिनिधी)
परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी भागात असलेल्या रेणुका चौक ते रनिंग ट्रॅक मार्गावर गत काही महिन्यांपासून पथदिवे नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते मजास इनामदार यांच्या प्रयत्नाने या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात आल्याने मोठी गैरसोय दुर झाली आहे.
बसवेश्वर कॉलनी भागात डोंगराच्या कडेने जात असलेल्या रेणुका चौक ते रनिंग ट्रॅक रस्त्यावर रात्री व पहाटे नागरीक विशेषतः महिला व्यायामासाठी मोठ्या संख्येने येत असतात या रस्त्यावर पथदिवे नसल्याने सर्वत्र अंधार होता.यामुळे व्यायामासाठी येणार्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते मजास इनामदार यांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधत ही बाब निदर्शनास आणुन दिली.न.प.प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करत या रस्त्यावर पथदिवे बसविले.या रस्त्यावरील अंधाराचा प्रश्न सुटल्याने मजास इमानदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा