श्रावण पर्व: पोलीसांचे सोमवारचे काटेकोर नियोजन....
श्रावणी सोमवार :पोलीस ठेवणार कडक बंदोबस्त
परळी (प्रतिनिधी) :
श्रावणी सोमवार निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभू श्री वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे. भाविकांना दर्शनाची सुविधा सुकर व्हावी, त्यांना योग्य वेळेत आणि कमी प्रतीक्षेत दर्शन मिळावे, यासाठी देवस्थानने नियोजन केले आहे.तसेच पोलीस प्रशासनानेही मंदिरात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
या बंदोबस्तात 04 पोलिस निरीक्षक, 27 पोलीस उपनिरीक्षक/सहायक पोलिस निरीक्षक, 133 पुरुष पोलीस अंमलदार, 40 महिला अंमलदार, 120 होमगार्ड, 01 RCP टीम, 01 BDDS (बॉम्ब शोध पथक) टीम तसेच 01 सध्या वेशातील पोलिसांची टीम तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराचा सुरक्षेसाठीचा पूर्ण स्टाफ कार्यरत असेल. सर्व भाविक भक्तांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रांगेचा वापर करावा, दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात गर्दी टाळून त्वरित बाहेर पडावे. मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही यासाठी भाविकांनी सहकार्य करावे. तसेच कोणत्याही भाविकाने बाहेर जाणाऱ्या मार्गांद्वारे मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये. सर्व भाविकांना केवळ मुख्य प्रवेशद्वारातूनच मंदिरात प्रवेश दिला जाईल अशी माहिती परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर. के. नाचण यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा