उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त....

 रविवारी पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन - डॉ.राजेश इंगोले

=======================

अंबाजोगाई ( वसुदेव शिंदे )

    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी 

अंबाजोगाई तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी मराठी पत्रकार परिषद वैद्यकीय कक्ष व राजकिशोर पापा मोदी  मित्र मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आसुन 

या आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय कक्ष प्रमुख सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले व राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

    शहरातील समाधान मानसोपचार रूग्णालय व व्यसनमुक्ती केंद्र व नेत्रालय, हाऊसिंग सोसायटी, पंचायत समिती जवळ, अंबाजोगाई या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार व‌ आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या वेळेत अंबाजोगाईत या भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली आहे. १५ जुलै रोजी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे. २२ जुलै रोजी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अंबाजोगाईत या भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पत्रकार बांधवांची डोळ्यांची तपासणी, हृदयरोग तपासणी, त्वचारोग तपासणी,ज्यांना आवश्यकता आहे अशांची इ सी जी,टूडी इको, सोनोग्राफी, रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती मराठी पत्रकार परिषद वैद्यकीय कक्ष प्रमुख 

सुप्रसिद्ध  मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी दिली आहे. 

   या धकाधकीच्या जीवनात पत्रकार बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्याचे काहीवेळा गंभीर परिणाम पत्रकार बांधवांना आरोग्य विषयक समस्यांनी भोगावे लागतात या करिता आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व पत्रकार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय कक्ष प्रमुख सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले व राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार