इनरव्हील क्लब परळी वैजनाथच्या कार्याचे पुण्यात गौरव अध्यक्ष श्रद्धा हालगे यांना "बेस्ट प्रेसिडेंट" पुरस्कार

परळी – इनरव्हील क्लब ऑफ परळी वैजनाथच्या अध्यक्षा सौ. श्रद्धा नरेश हालगे यांना बेस्ट प्रेसिडेंट" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला असून, त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. पुणे येथे पार पडलेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ च्या ४१व्या वार्षिक अधिवेशनात त्यांचा गौरव करण्यात आला.

या अधिवेशनात डिस्ट्रिक्टमधील सर्व क्लबच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला उद्योजक रांका, माजी चेअरमन शोभना पालेकर, डिस्ट्रिक्ट २५/२६ चेअरमन आशा देशपांडे, नेत्रा बकड, स्मिता चाकोते, तसेच असोसिएशनच्या चेअरमन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

श्रद्धा हालगे यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, असोसिएशन ट्रॉफी व विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अध्यक्षीय कार्याचा सर्वत्र गौरव झाला.

यावेळी भावना व्यक्त करताना श्रद्धा हालगे म्हणाल्या, गेल्या १५ वर्षांपासून इनरव्हीलच्या कार्यात सक्रीय आहे. अध्यक्षपदाचा अनुभव नसतानाही माझ्या कामावर विश्वास दाखवत, मला संधी दिली. या सन्मानामुळे माझ्या मेहनतीला खरी पावती मिळाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !