ना.पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत भाजपचा सामाजिक सेवा सप्ताह

२१ ते २७ जुलै  दरम्यान  विविध सामाजिक उपक्रम; सेवा सप्ताहाचे उद्या उदघाटन

परळी वैजनाथ,।दिनांक २०। राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल, पशुसंवर्धन,मंत्री तथा जालना जिल्ह्ययाच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे  यांच्या वाढदिवसा निमित २१ ते २६ जुलै दरम्यान शहरात सामाजिक सेवा सप्ताह राबविण्यात येणार असून या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उदघाटन उद्या सोमवारी होत असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.


   २१ तारखेला सकाळी ११ वा. ना. पंकजा मुंडे यांच्या अरुणोदय मार्केट मधील संपर्क कार्यालयात सेवा सप्ताहातील उपक्रमांचे उदघाटन होणार आहे.

असा असणार सामाजिक सेवा सप्ताह

-----------

२१ ते २७ जुलै - आधार कार्ड अपडेट,प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन २.० घरकुल नोंदणी  बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना नोंदणी स्थळ : पंकजाताई यांचे संपर्क कार्यालय, परळी वै.,ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी- स्थळ : उपजिल्हा रुग्णालय, मंगळवार २२ - रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत पंकजाताई यांचे संपर्क कार्यालय, बोधीवृक्ष वृक्षारोपण स.९.३० वा. स्थळ : भिमवाडी, स.१०.३० वा. स्थळ : हनुमान नगर,बुधवार २३ जुलै - सकाळी ९ वा. छत्री वाटप व कापडी पिशवी वाटप, सकाळी ११ वा., वह्या वाटप स.११.३० वा. माध्य. आश्रम शाळा, शिवाजी नगर,  व१२ वा. विलाल उर्दू प्रा. शाळा, हमालवाडी येथे

गुरुवार २४ जुलै - नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी, बीपी, ईसिजी, शुगर,कोलेस्ट्रॉल मोफत तपासणी वेळ : सकाळी १० ते दु. ५ स्थळः उपजिल्हा रुग्णालय, परळी, चित्रकला स्पर्धा वेळ स.९ वा.स्थळ : जिजामाता उद्यान,

युवकांसाठी स्पर्धा परिक्षा करिअर व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबीर ॲड. राहुल नावंदर (छत्रपती संभाजीनगर) वेळ : सकाळी ११ वा.स्थळ : वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वै. शुक्रवार दि. २५ जुलै २०२५:ना. ताईसाहेबांच्या दिर्घायुष्यासाठी होम हवन,निवासी विद्यार्थ्यांसाठी भोजन स्थळः आर्य समाज गुरुकुल, नंदागौळ रोड.सकाळी ९ वा.शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व वह्या वाटप स्थळ :वेळ सकाळी १०.३० सरस्वती विद्यालय, परळी वै. जिल्हा परिषद शाळा, परळी वैजनाथ.वेळ सकाळी ११. शनिवार दि. २६ जुलै २०२५ सकाळी ७ वा. श्री वैद्यनाथ प्रभुस अभिषेक स्थळ पंचम ज्योर्तिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर, परळी वै.,सकाळी ७.३० वा. श्री शनैश्वर मंदिर येथे महाआरती स्थळ : श्री वैद्यनाथ मंदिर पायथ्याशी, परळी वै. सकाळी ८ वा. सुगंधकुटी बौध्द विहार येथे बुध्दवंदना स्थळ: भिमनगर, परळी वै.सकाळी ८.३० वा. हुसेन शहावली दर्गा चादर चढवणे स्थळ: बंगला गल्ली, परळी वै. सकाळी ९ वा. अन्नपूर्णा देवी महाआरती स्थळ: श्रीरामदत्त मंदिर (बालाजी मंदिर), परळी वै.सकाळी १० वा. रुग्णाना फळे वाटप- स्थळ उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ.सकाळी ११ वा. महिला स्वच्छता कर्मचारी सन्मान स्थळ पंकजाताई संपर्क कार्यालय, परळी वै.सकाळी ११.३० वा. सुकन्या समृध्दी योजना नोंदणी स्थळ : पंकजाताई संपर्क कार्यालय, परळी वै.सकाळी १२ वा. शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस/वही वाटप स्थळ : वैद्यनाथ शाळा/ज्ञानबोधिनी शाळा, गणेशपार, परळी वै. 

        रविवार दि. २७ जुलै २०२५ सकाळी ११ ते दुपारी कॅन्सर रोग निदान शिबीरतज्ञ डॉक्टर्स डॉ. शैलेष अग्रवाल(तोंड व घसा कर्करोग तज्ञ, छत्रपती संभाजीनगर), डॉ. उत्पल गायकवाड (रेडियेशन कर्करोग तज्ञ छत्रपती संभाजीनगर), डॉ. केतन शिरसाट, (मेडिकल ऑनकोलॉजिस्ट, छत्रपती संभाजीनगर) स्थळ : वेदांत होमिओ क्लिनीक, नाथ रोड, औद्योगिक वसाहत कॉम्प्लेक्स,परळी. भविष्याची दिशा युवा शक्तिचा सन्मान ग्रामीण तरुणांचे भविष्य, समस्या, संधी आणि संघर्ष प्रमुख वक्ते  विलास बडे सहाय्यक संपादक, न्युज १८ लोकमत वेळ सकाळी ११ वा. स्थळ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ.

     या सामाजिक सेवा सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी केले  आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !