स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी....
प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा इसम पकडला; सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे शाखा, बीड पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणारा इसम पकडला असुन, त्याच्याकडून सुमारे 5 लाख 34 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई 23 जुलै 2025 रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास उजनी पाटी, ता. परळी, जि. बीड येथे करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता बालाजी सौदागर फड (वय 25, रा. धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या वाहनातून विविध कंपनीचा पान मसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. या आरोपीस व जप्त मुद्देमालासह बर्दापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र केकान, नाईक पोलीस कॉन्स्टेबल गोविंद भताने आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन आंधळे यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा