प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेरनिवड!
परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकरिणी: विद्यमान 'शिलेदारांच्याच' फेरनिवडी
विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, वैजनाथ सोळंके तालुकाध्यक्ष तर बाजीराव भैय्या धर्माधिकारी शहराध्यक्ष
बीड (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी विधानसभा अध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे विश्वासू गोविंद देशमुख यांची आज पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वैजनाथ सोळंके व शहराध्यक्षपदी बाजीराव भैया धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज बीड येथे संपन्न झालेल्या पदाधिकारी संवाद मेळाव्याच्या दरम्यान सदर नियुक्तीची पत्रे खासदार सुनील तटकरे तसेच माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर ही पदे रिक्त होती. दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता धनंजय मुंडे यांच्या टीम मधील त्यांचे विश्वासू गोविंद देशमुख यांच्यासह वैजनाथ सोळंके व बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली असून याबद्दल धनंजय मुंडे यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ रूपाली चाकणकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार बाळासाहेब आजबे, युवक नेते अजय मुंडे यांसह पदाधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.
परळी मतदार संघाच्या तीनही नेत्यांचे अभिनंदन
उत्तर द्याहटवाधनंजय मुंडे साहेब, राजेश्वरआबा चव्हाण, श्री सुनील तटकरे साहेब यांचे आभार