सुरक्षासेवेकरी यांचे प्रामाणिकत्व: सापडलेला मोबाइल शोध घेवुन मालकाला दिला परत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
वैद्यनाथ मंदिर परिसरात सुभाष चौक येथील भाविक संगीता धनंजय काळूमाळी या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या असताना त्या आपला मोबाइल विसरून गेल्या.
हा मोबाइल सुरक्षा रक्षक प्रियंका सरवदे यांना आढळून आला. त्यांनी तत्काळ प्रामाणिकपणा दाखवत मोबाइल चौकीत जमा केला. त्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके यांनी संबंधित भाविकांचा शोध घेऊन योग्य तपासणीअंती तो मोबाईल परत केला.
मंदिरच्या सुरक्षा सेवेकरी प्रियंका सरवदे यांच्या या प्रामाणिक व तत्पर सेवेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंदिर परिसरातील सुरक्षारक्षकांची कार्यक्षमता व निष्ठा यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित वाटत असल्याचे अनेकांनी नमूद केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा