चाकुहल्ल्याचे प्रकरण....
परळी शहरात जुन्या वादातून चाकूहल्ला; एक गंभीर जखमी, तिघांवर गुन्हा दाखल
परळी वैजनाथ: परळी शहरातील बेलवाडी गणपती मंदिरासमोरील ऑटो रिक्षा पॉईंट येथे 19 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जुन्या वादातून चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये नागेश कांबळे ( रा. भीमनगर, परळी) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी परळी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप नारायण कांबळे आणि त्यांचे दोन पुत्र बन्सी दिलीप कांबळे आणि परशुराम दिलीप कांबळे (सर्व रा. परळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बन्सी कांबळे याने फिर्यादी अभिजीत कांबळे यांचे वडील नागेश कांबळे यांच्या पोटात चाकू खुपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे अभिजीत कांबळे याने फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 172/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 109, 115(2), 352, व 3(5) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी पोउनि अमोल शिंगणे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असुन घटनास्थळी तात्काळ भेट देत पंचनामा, व्हिडिओ रेकॉर्डिंग व अन्य साक्षींची नोंद केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा