गृहविज्ञान विभागाचा स्तुत्य उपक्रम....!!!!
महिला महाविद्यालयात रक्षासूत्र निर्मिती कार्यशाळा
परळी वैजनाथ......
परळी येथील कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय हे विद्यार्थिनींच्या स्वावलंबनासाठी सदैव प्रयत्नशील असते . याचाच एक भाग म्हणून या महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागातर्फे आज एक दिवशीय *रक्षासूत्र निर्माण* ( राख्या तयार करणे ) कार्यशाळेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे या होत्या तर उद्घाटक म्हणून संस्थेच्या संचालिका सौ. छायाताई देशमुख या उपस्थित होत्या. या प्रसंगी प्रशिक्षक म्हणून कु .श्यामल उजगरे यांचीही उपस्थिती लाभली .
या प्रसंगी सौ. छायाताई देशमुख यांनी मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले. तर प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे यानी या कार्यशाळेतून उद्योजक कसे होता येईल या विषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहविज्ञानविभाग प्रमुख डॉ. रागिणी पाध्ये मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. कचरे मॅडम डॉ. गुळभिले मॅडम, डॉ.कुलकर्णी सर, डॉ. जोशी सर, डॉ. मुंडे मॅडम यांची उपस्थिति लाभली .विद्यार्थिनीवृन्दही मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा