MB NEWS:स्व.सुवालाल वाकेकर स्मृतिप्रीत्यर्थ रत्नेश्वर विद्यालयात वह्या वाटप

स्व.सुवालाल वाकेकर स्मृतिप्रीत्यर्थ रत्नेश्वर विद्यालयात वह्या वाटप




 स्व. सुवालाल वाकेकर यांनी वंचितांच्या डोळ्यातील आसवे पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम केले - प्रा. राजकुमार यल्लावाड

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर प्रतिष्ठानच्या वतीने स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध शाळांमध्ये २५ हजार वह्या वाटप करणे चालू आहे. आज टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयात उद्योजक दीपक वाकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात वह्याचे वाटप करण्यात आले. 

       यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी स्व. सुवालालजी यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकताना, "काकाजी हे वंचितांच्या डोळ्यातील आसवे पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम करत असत.गरीब, होतकरू, वंचित, उपेक्षित यांना त्यांनी सदैव मदत केली आहे.अर्थातच आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी दातृत्वाची भूमिका पार पाडली. " असे मत मांडले.पुढे ते बोलताना ,

त्यांची मुले विजय वाकेकर, डाॅ. प्रकाश वाकेकर व दीपक वाकेकर हा वारसा समृद्धपणाने पुढे चालवत आहेत. असे त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी अशोक कांकरिया यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    उपस्थित पाहुण्यांमध्ये असलेले महावीर बडेरा यांनी विद्यालयास मेडिकल किट भेट दिली. यावेळी व्यावसायिक माणिक डापकर यांची उपस्थिती होती. अध्यक्षांच्या वतीने अध्यक्षीय समारोप करत असताना महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांनी स्व.सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत देत अडचणीच्या वेळी आपल्या कुटुंबाला सुद्धा किती महत्त्वपूर्ण मदत केली होती याची आठवण काढली. पुढे बोलताना  "विद्यार्थ्यांनीही वाकेकर कुटुंबांच्या या दातृत्व वृत्तीचं अनुकरण करावं. अर्थातच तुम्ही सर्व विद्यार्थी निश्चितच अनुकरणशील बनाल. "अशी भूमिका मांडून आशावाद व्यक्त केला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक, प्राचार्य प्रदीप मुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरवदे यांनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन कराड तर आभारप्रदर्शन वटाणे यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------

Click:♦️ _नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय!_ > _प्रवेश अर्जासाठी केंद्र सरकारचे ओबीसी सर्टिफिकेट अनिवार्य; जाचक अटिमुळे पालकवर्ग आक्रमक_

Click:● _खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशा सर्व प्रक्रियेचा बनाव: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल २४ लाखांची फसवणूक_

Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_

Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !