परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

● उत्सुकता: संचालक मंडळ बिनविरोध की निवडणूक होणार ?

वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!



१७ जागांसाठी रणधुमाळी, १० ऑगस्टला मतदान तर 12 ऑगस्टला मतमोजणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – 
      वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी वैजनाथच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी निवडणुकीचा कार्यक्रम  जाहीर केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या या बँकेवर ना.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ आहे.
          ७ ते ११ जुलै दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १४ जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत १५ जुलै ते २९ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. अंतिम यादी व चिन्हांचे वाटप ३० जुलै रोजी होईल. मतदान १० ऑगस्टला – सकाळी ८ ते संध्या ४ वा.पर्यंत होणार आहे.१२ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होवुन  निकाल लागेल.

🔹१७ जागा व संचालक जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे:

सर्वसाधारण – १२ जागा

अनुसूचित जाती – १ जागा

इतर मागासवर्गीय – १ जागा

भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग – १ जागा

महिला प्रतिनिधी – २ जागा


निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत: 7 जुलै ते 11 जुलै, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत

छाननी प्रक्रिया: 14 जुलै

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: 15 जुलै ते 29 जुलै

चिन्हांचे वाटप व उमेदवारांची अंतिम यादी: 30 जुलै

मतदानाचा दिवस: 10 ऑगस्ट, सकाळी 8 ते संध्याकाळी 4

मतमोजणी: 12 ऑगस्ट, सकाळी 8 वाजल्यापासून सुरू





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!