उपजिल्हा रुग्णालय येथे होणार उद्घाटन
आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय परळी येथे किडनी विकार रुग्णांसाठी ८ डायलेसिस मशीन उपलब्ध - डॉ संतोष मुंडे
ना.पंकजा मुंडे व आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांचे आभार-डॉ संतोष मुंडे
उपजिल्हा रुग्णालय येथे होणार उद्घाटन
परळी (प्रतिनिधी)...
परळी तालुका व परिसरातील किडनी विकार रुग्णांना मोफत डायलिसिस सुविधा परळी मध्येच मिळावी आणि रुग्णांची होणारी आर्थिक व शारीरिक हेळसांड होऊ नये यासाठी मा.आ.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे आठ डायलिसिस मशीन उपलब्ध अशी माहिती दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.
या आठ डायलिसिस मशीनच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मा.आ.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते आज दिनांक १२ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजता उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय परळी येथे सुरू होत असलेल्या या मोफत डायलिसिस सुविधेमुळे किडनी विकार रुग्णांना आता त्यांच्या डायलेसिस साठी पुणे,छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. आणि त्यांची होणारी आर्थिक व शारीरिक हेळसांडही आता होणार नाही.कारण या किडनी विकार रुग्णांची मोफत डायलिसिस सुविधा उपजिल्हा रुग्णालय परळी येथेच होणार आहे यामुळे सर्व किडनी विकार रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
या डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या बद्दल मा.आ. धनंजय मुंडे तसेच मा ना. पंकजाताई मुंडे व आरोग्य मंत्री मा.ना.प्रकाशराव आबिटकर यांचे डॉ.संतोष मुंडे यांनी आभार मानले.
अशा या डालेसिस मशीन उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान परळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे तसेच प्रशांत व्हि.सीनियर मॅनेजर HLL लाईफ केअर लिमिटेड ,सुनील व्हनमाने कॉलिटी मॅनेजर राहुल तिडके डिस्ट्रिक्ट ,कॉर्डिनेटर HLL चे मुंजा गुट्टे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा