संवेदनशील बापाला लेकीचा मनापासून अभिमान.......!

धनंजय मुंडे म्हणतात, "Proud of you Janhavi!" : धनंजय मुंडेंची कन्या अमेरिकेतून घडतेय नव्या काळाची संवेदनशील पत्रकार!

     

       राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमठवणारे महाराष्ट्राचे फायरब्रॅण्ड नेते, माजीमंत्री धनंजय मुंडे हे नुकतेच आपल्या कन्या जान्हवीच्या यशाने भारावून गेल्याचे बघायला मिळत आहे. कारणही तसेच आहे – जान्हवी सध्या अमेरिकेतील प्रतिष्ठित Wesleyan University मध्ये Government आणि Literature या दोन विषयांत पदवी घेत आहे, पण हे शिक्षण केवळ तिला स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी उपयोगी पडावे, ही तिची मनापासूनची तळमळ आहे.शासन, समाज आणि मानवी हक्क यामधल्या नातेसंबंधांचा खोल अभ्यास करत असलेली जान्हवी, आज तिच्या वयाच्या पुढे जाऊन विचार करतेय. तिची ही जाण आणि संवेदनशीलता वडिल धनंजय मुंडे यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू आणते.

जान्हवी कॉलेजच्या वृत्तपत्रात आधी ‘फोटो आणि विशेष लेख विभागाची प्रमुख’ म्हणून कार्यरत होती. आज ती संपूर्ण वृत्तपत्राची मुख्य संपादक आहे.
      CT Mirror या अमेरिकेतील एक प्रतिष्ठित, प्रभावशाली आणि विश्वासार्ह अशा वृत्तसंस्थेत जान्हवी पत्रकार म्हणून कार्यरत आहे. इथे ती समाज, सरकार आणि लोकांच्या समस्या या विषयांवर प्रामाणिक आणि संवेदनशीलपणे लिखाण करते.
त्याचबरोबर, ती सोशल मिडिया आणि तुरुंगातील शिक्षणावर काम करणाऱ्या संस्थांसोबत संशोधन करत आहे. "ती जे काही करतेय, ते केवळ यशासाठी नाही, तर समाजासाठी आहे... आणि हेच तिचं खऱ्या अर्थानं मोठेपण आहे!" असं म्हणत धनंजय मुंडे यांनी सोशल मिडियावर आपल्या लेकीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
"माझी कन्या जान्हवीचा मनापासून अभिमान वाटतो!" अशा शब्दात धनंजय मुंडेंनी अभिमान व्यक्त केला आहे.या शब्दांमागे केवळ एका वडिलांचा भावनिक स्वभावच नाही, तर एका समाजधूरीण पुढार्‍याच्या नजरेतून उभी होत असलेली नवी पिढी पाहण्याचं कौतुकही आहे.
       जान्हवी धनंजय मुंडे सध्या अमेरिकेतील प्रख्यात Wesleyan University मध्ये Government आणि Literature या विषयांत पदवी घेत आहे. तिचा अभ्यास केवळ पुस्तकी नाही. ती मानवी हक्क, न्याय आणि शासन-समाज यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांवर खोलवर चिंतन करते.कॉलेजच्या सुरुवातीच्या काळातच तिने विद्यापीठाच्या वृत्तपत्रात “फोटो आणि विशेष लेख विभागाची प्रमुख” म्हणून आपली छाप पाडली. तिने लिहिलेल्या सामाजिक विषयावरील लेखांनी महाविद्यालयाच्या भिंतीवरून ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत चर्चा निर्माण केल्या.आज तीच जान्हवी त्या वृत्तपत्राची मुख्य संपादक आहे.
CT Mirror मधून समाजाशी थेट संवाद
     जान्हवी सध्या अमेरिकेतील प्रतिष्ठित आणि गंभीर पत्रकारितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या CT Mirror या वृत्तसंस्थेत पत्रकार म्हणून काम करते आहे.CT Mirror हे माध्यम सार्वजनिक धोरण, समाजातील विषमता, आणि शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतं.
जान्हवी इथे “Governance and Community Impact” या विभागात काम करते आणि तिच्या बातम्या  समुदायांवरील धोरण प्रभाव, कारागृह व्यवस्थापन, आणि शिक्षणातील अन्यायावर प्रकाश टाकतात.जान्हवीचा अभ्यास याच विषयांपुरता मर्यादित नाही. तुरुंगातील शिक्षणावर काम करणाऱ्या संस्थांसोबत ती संशोधन करत आहे. तिचं हे संशोधन भविष्यात धोरणकर्त्यांना नवी दिशा देऊ शकेल.

संवेदनशील बापाला लेकीचा मनापासून अभिमान..
      धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियावरून जान्हवीच्या कार्याचा गौरव करताना म्हटलं:“माझी कन्या जान्हवीचा मनापासून अभिमान वाटतो! तिची मेहनत, संवेदनशीलता आणि समाजासाठीची तळमळ हेच तिचं मोठेपण आहे.”एक वडील म्हणून त्यांनी आपल्या मुलीबद्दलचा गौरव व्यक्त केला, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी तिच्या कामाचा सामाजिक संदर्भही अधोरेखित केला."Proud of you Janhavi!" या एका वाक्यातून एका बापाचं प्रेम, एका पुढाऱ्याची आशा आणि एका समाजधुरीणी व्यक्तीमत्त्वाची नव्या पिढीबाबतची उमेद झळकते.

● अशी आहे धनंजय मुंडेंची पोस्ट....

        माझी कन्या जान्हवीचा मनापासून अभिमान वाटतो!

जान्हवी सध्या Wesleyan University, USA मध्ये  Government आणि Literature या दोन विषयांमध्ये पदवी घेत आहे. मानवी हक्कांसाठी अभ्यास करणं हे तिचं खास क्षेत्र आहे.

कॉलेजच्या वृत्तपत्रात ती आधी फोटो आणि विशेष लेख विभागाची प्रमुख होती, आता ती संपूर्ण वृत्तपत्राची मुख्य संपादक झाली आहे!

CT Mirror या अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तसंस्थेत ती सध्या पत्रकार म्हणून काम करते आणि तिथे समाज, सरकार आणि लोकांच्या प्रश्नांवर ती संवेदनशीलपणे लिखाण करते.

शिक्षणासोबतच ती सोशल मिडिया आणि जेलमध्ये शिक्षण देणाऱ्या संस्थेत संशोधन करत आहे.

बाप म्हणून मला तिच्या मेहनतीचा, संवेदनशीलतेचा आणि प्रगतीचा खूप अभिमान वाटतो.

ती जे काही करतेय, ते केवळ यशासाठी नाही, तर समाजासाठी आहे आणि हेच तिचं खऱ्या अर्थानं मोठेपण आहे!

Proud of you Janhavi!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !