ऊसतोड कामगार महिलांची करणार विशेष आरोग्य तपासणी!
ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्त्रीरोग तज्ञ संघटनेचा स्तुत्य उपक्रम
जिल्ह्य़ातील ऊसतोड कामगार महिलांची करणार विशेष आरोग्य तपासणी, लाभ घेण्याचे आवाहन
परळी वैजनाथ
ऊसतोड कामगार हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि ना. पंकजाताई मुंडे यांच्या जिव्हाळ्याचा विषय... त्यांच्या प्रत्येक सुख - दुखात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या अहोरात्र काम करीत असतात. त्यांचा हाच जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी लक्षात घेऊन स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या जिल्हाध्यक्षा, परळी मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. शालिनीताई कराड आणि सचिव डॉ शरद शिंदे आणि सर्व सदस्य यांनी अभिनव आणि स्तुत्य उपक्रम घेतला आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरातील ऊसतोड कामगार महिलांची विशेष आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्य़ातील सर्व शासकीय रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ डॉक्टर महिलांची मोफत तपासणी करणार आहेत.
राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा 26 रोजी वाढदिवस आहे. "माझा वाढदिवस हा बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा" असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संघटनेच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनीताई कराड यांनी "ऊसतोड महिलांची मोफत आरोग्य तपासणी" हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शनिवार दिनांक 26 जुलै रोजी बीड जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय बीड अशा सर्व ठिकाणी ऊसतोड महिला मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील स्त्रीरोग संघटनेने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतला असुन सर्व ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून महिलांची तपासणी करणार आहेत.
ऊस तोडणीसाठी गेल्यानंतर सहा महिने त्यांच्या आरोग्याची हेडसांड होते. त्या आधीच त्यांची योग्य आरोग्य तपासणी मार्गदर्शन त्यांना होणार आहे. जिल्हाभरातून ऊसतोड कामगार महिलांनी आपापल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा स्त्रीरोग संघटना व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा