"सन्मान सैनिकांचा गौरव देशभक्तीचा" उपक्रमांतर्गत कारगिल योद्धा ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर यांचा जय हिंद ग्रुप च्या वतीने सन्मान
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- योगेश्वरी जय हिंद ग्रुप च्या वतीने कारगिल युद्धत वायुदलाच्या ऑपरेशन सफेद मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले वालवडकर यांचा सत्कार करण्यात आला.
कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सैन्य दलातील कार्यरत सैनिक, अधिकारी, शहीद माता-पिता, पत्नी यांचा गौरव करण्यात येत आहे. हा उपक्रम जय हिंद ग्रुपने राबविला आहे. या उपक्रमांतर्गत कारगिल युद्धात सहभाग घेतल्याबद्दल वालवडकर यांचा सत्कार जय हिंद ग्रुप चे अध्यक्ष मेजर एस पी कुलकर्णी यांनी केला.
कॅप्टन वालवडकर हे योगेश्वरी चे माजी विद्यार्थी आहेत . त्यांनी वायुसेनेत अधिकारी म्हणून कार्य केले आहे. या त्यांच्या देशसेवेमध्ये त्यांनी ऑपरेशन सफेद मध्ये भाग घेऊन म्यानमार या देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले. कारगिल युद्धात त्यांनी तिन्ही दलाच्या समन्वयातून कार्यवाही मध्ये भाग घेतला. त्यांचा संस्थेला निश्चितच अभिमान आहे. म्हणून यावर्षी जय हिंद ग्रुप ने हा उपक्रम राबवून सैन्यप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व त्यांच्या देशभक्ती उदंड धैर्य साहस पराक्रम याचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी ठाणे येथील नौसेना अधिकारी राजेश समेट, ग्वालियर येथील हवालदार सुनील कुमार ,आसाम येथील हवालदार नाग यांनाही जय हिंद ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा