आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन
परळी प्रतिनिधी .....
नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.श्री.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नाथ शिक्षण संस्थे अंतर्गत शालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाथ शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे व सहसचिव प्रदीप खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15/07/ 2025 ते 22/07/2025 पर्यंत नाथ शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विद्यालय व महाविद्यालयातील सर्व प्राचार्य,मुख्याध्यापक, क्रीडा व सांस्कृतिक प्रमुख यांच्या बैठकीत प्रथमोपचार मार्गदर्शन,पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन,शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवस सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नाथ शिक्षण संस्थेचे
समन्वयक प्राचार्य अतुल दुबे, प्राचार्य व्हि.एन.शिंदे , आर.बी.गुट्टे, मुख्याध्यापक श्री. कदरकर, श्री.साखरे, श्रीमती वानखेडे मॅडम, श्री.राठोड, श्री.आघाव, श्रीमती धस मॅडम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
-----------------------------------------------
Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी
Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा