इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

टीपीएस काॅलनीतील सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर.....

 शक्तीकुंज वसाहतीत चोरी: घरफोडीत १ लाख ६२ हजारांचा ऐवज लंपास



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
    परळीतील शक्तीकुंज वसाहतीत पुन्हा एक जबरी चोरी झाली असुन या घरफोडीत १लाख ६२ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, नंदकुमार बळीराम राठोड वय-३५ वर्षे व्यवसाय वकील रा. एकवी तांडा ता. औसा जि. लातुर ह.म टीपीएस कॉलनी परळी वै. यांच्या घरी दिनांक २०/०७/२०२५ रोजी सायंकाळी ५ वा. ते दि. २१/०७/२०२५ रोजीचे ५.३० वा.चे पूर्वी जबरी चोरीची घटना घडली.अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोंडा तोडुन आत मध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉक व लॉकरचे लॉक तोडुन आतमधील सोन्याचे दागीने व नगदी रुपये व एक मोबाईल  लंपास केला आहे.या घरफोडीत ५९,३२८ रु.किंमतीचे सोन्याच्या गंठणमधील मणी,३२,०००/- रुपये किंमतीचा सोन्याचा पत्ता,४५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील सरपाळे,५,०००/- रुपयाचे लहान मुलाचे कानातील,१४,०००/- रु. नगदी,७००० रु.किंमतीचा जुना वापरता मोबाईल असा एकुण १,६२,३२८ ऐवज लंपास करण्यात आला आहे.
       याप्रकरणी  संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुरन. १५४/२०२५ कलम ३०५,३३३,३३१ (४) मा. न्या. संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास संभाजीनगर पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या