सामाजिक वृत्त /अमोल जोशी....
दुसऱ्याला मदतीचा हात देण्याची रोटरीची शिकवण प्रेरणादायी : पीडिजी रो मोहन पालेशा
रोटरीचे नूतन अध्यक्ष विकास उमापूरकर तर सचिव सुमित जैैस्वाल यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक वृत्त /अमोल जोशी....
रोटरीचे नूतन अध्यक्ष विकास उमापूरकर तर सचिव सुमित जैैस्वाल यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. आज समाजात गुन्हेगारीचे नवनवीन प्रकार उघडकीस येत असताना सामाजिक संवेदनशीलता कमी होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. समाजातील सर्व स्तरांतील घटकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामूहिकपणे कार्य करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत रोटरीने दुसऱ्याला मदतीचा हात देण्याचे जे मूल्य शिकवले आहे. ते समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. रोटरी ही संस्था “सेवा सर्वाेपरि” या तत्त्वावर काम करते. “दुसऱ्याला मदतीचा हात देणे” हेच तिचे मुख्य ध्येय आहे असे प्रतिपादन रोटरीचे पीडिजी मोहन पालेशा यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ बीडचा 40 व्या पदगृहण सोहळा हॉटेल ऑन्विता येथे शनिवारी सायंकाळी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास श्रीराम मंदिर ट्रस्टचे मुख्य आर्थिक सल्लागार सी.ए.राज मणियार, सहायक प्रांतपाल प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते. प्रारंभी अमर डागा यांच्या सुमधुर बासरी वादनाने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष मेघराज पिंगळे यांनी नूतन अध्यक्ष विकास उमापूरकर यांच्याकडे तर मावळते सचिव संदीप खोड यांनी नूतन सचिव सुमित जैस्वाल यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. रोटरीचे पीडिजी मोहन पालेशा यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष विकास उमापूरकर यांनी रोटरी क्लबचे हे 40 वे वर्ष क्लब मधील सर्व माजी अध्यक्षांच्या सेवेस समर्पित वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याचा मानस व्यक्त केला. सूत्रसंचालन सुनील जोशी,राजेंद्र मुनोत यांनी केले.या पदग्रहण कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून चार्टर प्रेसिडेंट अभय कोटेचा आणि को. चेअरमन शरद लोढा यांनी काम पाहिले. आभार सुमित जैयस्वाल यांनी मानले. यावेळी पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Congratulations Team 💐💐
उत्तर द्याहटवा