सर्व स्तरांतून अभिनंदन !!!!!

ॲड.प्रकाश मुंडे यांची परळी वैद्यनाथ काँग्रेस तालुकाध्यपदी निवड 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

      काँग्रेसचे पक्षाचे धडाडीचे युवक नेते तथा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले अँड. प्रकाश बाबुराव मुंडे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या परळी वैद्यनाथ तालुकाध्यपदी निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री अशोक पाटील  व बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अँड.प्रकाश बाबुराव मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

         अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या परळी वैद्यनाथ काँग्रेसच्या तालुकाध्यपदी अँड.प्रकाश बाबुराव मुंडे यांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे. या बाबत दिलेल्या पत्रकात म्हटले की, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार परळी वैद्यनाथ तालुकाध्यपदी निवड करीत आहे. आपणास जाणीव आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या देशाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  मल्लीकार्जुन खर्गे,  देशाचे विरोधी पक्ष नेते  खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्या तथा हिमाचल प्रदेश प्रभारी खासदार सौ. रजनीताई पाटील, महाराष्टाचे प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला, बीड जिल्हा प्रभारी  देविदास भन्साळी, हे विद्यामान भाजप सरकारच्या जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ् धोरणावर तसेच सर्व सामान्य जनतेला भेडवसावण्याच्या महागाई आणि भ्रष्टाचार या सारख्या गंभीर विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत. धर्मनिरपेक्ष आणि सर्व समावेशक विकास देणारे काँग्रेस सरकार राज्यत व देशात आणण्यासाठी मेहनत घेत आहेत.आपणही काँग्रेसच्या मार्फत पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रचंड मेहनत घ्याल याची मला खात्री आहे. 

      बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, अखिल भारतीय राष्ट्रीय किसान सभाच्या समन्वय बाबुराव मुंडे, काँग्रेसचे आदित्य पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सर्वसामान्यांना हाक्काचे व्यासपिठ निर्माण करण्यासाठी आपण दिवस-रात्र मेहनत घ्याल अशी आशा व्यक्त करतो असे नमुद केले आहे.  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी व खा.राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस लाख सर्वसामान्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी तसेच परळी तालुक्यात काँग्रेस तळागळा पर्यंत वाढविण्यासाठी व बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी व पक्षाची धेय्य धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाअधिक प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध  असल्याचे नवनिर्वाचित अँड. प्रकाश बाबुराव मुंडे यांनी सांगितले.

    तालुक्यातील कन्हेरवाडी येथील काँग्रेसचे निष्ठावंत  अँड.प्रकाश मुंडे यांनी यापुर्वी अनेक पदावर काम केले आहे. वकील असून ,निर्व्यसनी, चांगला गुणांचा,निडर,हिम्मतवान आहे,  1990-93ला कॉलेज जीवनामध्ये परळी तालुका एन एस यु आय  चे अध्यक्ष होता,1993-96 युवक काँग्रेस चा अध्यक्ष म्हणून उत्तम काम केलेले आहे.पुढे 1996 ला औरंगाबाद ला  एल.एल.बी ला असताना मराठवाडा विद्यापीठात काँग्रेस प्रणित विविध पॅनल सिनेट, विद्यार्थी सांसद निवडणूकित प्रचार करून पॅनल निवडून आणण्यात फार मोठा वाटा होता. औरंगाबाद येथे  माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज येथे शिक्षण घेतले, त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अखिल भारतीय राष्ट्रीय किसान सभाच्या समन्वय बाबुराव मुंडे वडिल यांनी जिल्हा परिषद निवडणूक व आई ची जि. प.निवडणूकित प्रचार यंत्रणा व नियोजन फार उत्तम प्रकारे केले होते. माजी मंत्री,अशोकराव पाटील यांच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारातही खूप मोठा सहभाग असून, परळीसह संपुर्ण जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे.तसेच भारतीय काँग्रेस कमिटीच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्या नंतर त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. युवकांमध्ये ते लोकप्रिय असून, पक्षाच्या कामांसह विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो, त्यांच्या याच कार्याची दखल घेवुन त्यांना आता पक्षाने जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रीय आहेत. त्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांची पक्षावरची निष्ठा व  प्रेम निष्ठा याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळात आपण निश्चित तन-मन-धनाने प्रयत्न करू अशी ग्वाही या नियुक्तीनंतर नवनिर्वाचित सरचिटणीस अॅड.प्रकाश बाबुराव  मुंडे यांनी दिली आहे.  परळी वैद्यनाथ तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी  अँड. प्रकाश मुंडे यांच्या निवडीबद्दल परळीसह जिल्ह्यातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !