राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत G-champ अकॅडमीचे घवघवीत

पाटोदा /अमोल जोशी 

राज्यस्तरीय जी-चॅम्प अब‌‌ॅकस स्पर्धेत पाटोदा येथील.     G - Champ अकॅडमीने मोठे यश मिळवत, शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. जून महिन्यात  संभाजीनगर येथे झालेल्या या  प्रतिष्ठित स्पर्धेत पाटोदा  शहरातील १६ जणांच्या चमूने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रेम आगलावे आणि ‌‌श्रेया वसंत दराडे या दोन विद्यार्थ्यांनी सर्वोच्च सुपरस्टार ट्रॉफी पटकावत सन्मान मिळवला. तसेच सिध्देश्वर बाबू गर्जे ,वेदिका महादेव सुकाळे, सक्षम विशाल जावळे यांनी प्रथम क्रमांक तसेच गणेश चौरे दितीय क्रमांक आणि अनिकेत महादेव सुकाळे , अमन सत्यद,या दोघांनी तृतीय क्रमांक मिळवून आपली प्रतिभा सिद्ध  केली.


सुमारे ७५% विदयार्थानी कमी वेळेत १००% अचुक गणनापध्दतीने आपले पेपर पूर्ण करत सार्धेत उल्लेखणीय कामगीरी केली. या स्पर्धेत अवघ्या 7 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे होते.या यशामुळे पाटोदयाचे नाव राज्यस्तरावर झळकले असून आपल्यासाठी हे एक अभिमानाचे क्षण आहेत. या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका सौ. मंजिरी श्रीहरी पांडव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांना या कार्यक्रमात बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या  आणि पांडव मॅडमच्या या यशाबद्‌दल सर्व पालक आणि नागरीकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !