मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याच्या सल्ल्याचा हवाला देत, संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दरम्यान धनखड यांनी या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचेही सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात, धनखड यांनी पुढे त्यांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेला पाठिंबा आणि सौदार्हपूर्ण संबंधांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आणि त्यांचा पाठिंबा अमूल्य असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकल्याचेही धनखड यावेळी म्हणाले.

“संसदेतील सर्व सदस्यांकडून जे प्रेम, विश्वास आणि सन्मान मिळाला तो माझ्या आठवणीत जन्मभर राहिल. मी या महान लोकशाहीसाठी आभारी आहे, मला या महान लोकशाहीमध्ये उपराष्ट्रपती म्हणून अनुभव आणि ज्ञान मिळाले, जे अत्यंत मौल्यवान होते. ही माझ्यासाठी सौभाग्य आणि समाधानाची गोष्ट आहे की मी भारताची अभूतपूर्व आर्थिक प्रगती आणि परिवर्तनकारी काळातील वेगाने होणारा विकास पाहिला आणि त्यामध्ये माझं योगदान दिलं. या महत्त्वपूर्ण काळात सेवा करणे माझासाठी खरी सन्मानाची बाब आहे. आज मी हे पद सोडत आहे तेव्हा माझ्या मनात भारताचे यश आणि उज्वल भविष्यासाठी अभिमान आणि अतूट विश्वास आहे, ” असे धनखड त्यांच्या पत्रात म्हणाले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा