MB NEWS- Missing Case.....
नवरा बाजाराला जाताच दोन मुलांची आई बेपत्ता
केज :- नवरा भाजीपाला विक्री करण्यासाठी बाहेरगावी जाताच दोन मुलांची आई असलेली एक २६ वर्षाची महिला केज शहरातून बेपत्ता होण्याची खळबळजनक घटना घडली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक कुटुंब हे केज शहरात राहत असून ते कुटुंब भाजीपाला आणि माळव्याची विक्री करून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत. दि. १६ जुलै रोजी सदर महिलेचा नवरा हा केज तालुक्यातील तर लव्हुरी येथील आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी गेला होता. दुपारी ४:०० वाजता त्यांना लिंबाचीवाडी येथील त्यांच्या मावसभावाने कळविले की, त्याच्या बायकोने फोन करून पैसे मागितले होते.
दरम्यान रात्री घरी आल्या नंतर भाजीपाला विक्रेत्याने त्याच्या बायकोची चौकशी केली असता ती आढळून आली नाही. तिचा मोबाईल देखील घरीच होता.
या प्रकरणी महिलेच्या नवऱ्याच्या तक्रारी वरून ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेपत्ता झालेल्या महिलेची उंची ५ फुट, रंग सावळा, बांधा मध्यम, अंगात मेहंदी रंगाची साडी, केस लांब काळे, गळ्यात बेनटेक्सचे मंगळसुत्र, कानात सोन्याचे रिंग आहे.
सदर महिला कोणाला आढळून आल्यास जवळच्या पोलिस ठाण्या किंवा केज पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे आणि तपासी पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा