MB NEWS- police action mode......
ध्वनिप्रदूषण करत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेंन्सरवर पोलिसांचे बुलडोझर
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
अंबाजोगाई शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक शहर असल्याने आजूबाजूच्या शहरातील नागरिक देखील अंबाजोगाई मध्ये वास्तव्यास येत आहेत. लोकसंखेप्रमाणेच शहरात वाहनांची संख्या देखील त्याच प्रमाणात वाढत आहे. यामध्ये विविध प्रकारचे दोन चाकी वाहने हे विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यातील काही मोटारसायकलच्या आवाजाणे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अशा कर्णकर्कश आवाजाने अंबाजोगाई शहरातील नागरीक हैराण झाले होते. याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांच्या पथकाने गुरुवार दि १७ रोजी एक मोहीम राबवून या मोहिमेत ३० बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावर बुलडोझर फिरवण्यात आले .
पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मोटारसायकलचे क्रमांक देण्यात आले . अशा मोटारसायकल ची शहानिशा करून त्यांच्या सायलेन्सरचा आवाज तपासून मोठा आवाज करणारे सायलेन्सर काढून त्यावर पोलिसांनी बुलडोझर फिरवले. मागील अनेक दिवसांपासून या कर्णकर्कश आवाजाने हैराण झालेले नागरिक आज पोलीस प्रशासनास धन्यवाद देत होते.
सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे माध्यमांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अंबाजोगाईत संवाद बैठक घेतल्यानंतर अंबाजोगाई येथील वाहतूक शाखेच्या पथकाला असा आवाज करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी व त्या गाड्यांचे सायलेन्सर काढून पोलीस स्टेशनला जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या . त्या सूचनेनुसार जमा केलेले सर्व सायलेन्सर गुरुवार दि १७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वांसमोर त्यावर बुलडोजर फिरवण्यात आले. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे मोठा आवाज करणाऱ्या वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक शरद जोगदंड , ए पीआय कांबळे, वाहतूक पोलीस मधुकर रोडे, पी डी फड, बाळासाहेब पारवे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत चादर,दत्ता इंगळे, कृष्णा वडकर हे कर्मचारी सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा