MB NEWS:धार्मिक वृत्त /अमोल जोशी......

गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता




    धार्मिक वृत्त /अमोल जोशी ...

पंढरपूर: आज गोपाळपूर नगरी भाविकांच्या गर्दीने,  श्री विठ्ठलाच्या नामस्मरणाच्या गजराने आणि भक्तीमय वातावरणाने दुमदुमली.

संत सद्गुरु श्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये, परंपरेनुसार गोपाळपूर येथे आषाढी वारीची सांगता गुरुवर्य श्रीकैवल्यमहाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या भक्तिरसात न्हालेल्या सोहळ्याचा परमोच्च क्षण म्हणजे दहीहंडी फोडून परंपरेची पूर्णता!  आषाढी आणि कार्तिकी वारीस गोपाळपूर येथे दहीहंडी फोडण्याचा मान केवळ आणि केवळ श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेचा असतो, आणि यंदाही ही अनेक शतकांपासून चालत आलेली परंपरा तशीच टिकवली गेली.

यावेळी गोपाळपूरचे सरपंच मा. वैभव भोसले यांनी गुरुवर्य श्रीमहाराजांचे प्रेमपूर्वक स्वागत व सत्कार केला.

Click:♦️ _वैद्यनाथ बँक निवडणुक : उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस; आत्तापर्यंत ४५ नामनिर्देशन अर्ज दाखल_


कीर्तनातून श्रीमहाराजांनी वैष्णवांचं एकत्व, कृष्णभक्तीचा गूढ अर्थ, आणि संत तुकाराम महाराजांचे 'कंठीं धरिला कृष्णमणी' हे अभंग समरसतेने उलगडले:

कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनी प्रकाश ॥

काला वाटूं एकमेकां । वैष्णव निका सम्भ्रम ॥

 हा केवळ एक धार्मिक सोहळा नव्हे, तर वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तिपरंपरेचा झळाळता वारसा आहे असे कैवल्य महाराज यांनी प्रतिपादन केले .











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !