परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:धार्मिक वृत्त / अमोल जोशी....

सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

   धार्मिक वृत्त / अमोल जोशी

नांदेड ः गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुवारी (दि. 10) येवती (लघु आळंदी)ता. मुखेड) येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांच्या दर्शनासाठी व गुरुमंत्र घेण्यासाठी भाविकांचा सागर लोटला होता. यावेळी महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.



दरवर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी लघु आळंदी म्हणून ख्यातकिर्त असलेल्या  येवती येथे श्री प.पू.सद्गुरु नराश्याम महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मराठवाडा व कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यावेळी इच्छुक भाविकांना गुरुमंत्र देऊन दीक्षा दिली जाते. त्यासाठी भाविक लांबवरुन प्रवास करुन येत असतात.


मठ परिसरात अलीकडे चांगल्या पैकी भौतिक सुविधा झाल्याने भाविकांची सोय झाली आहे. यावर्षी सुद्धा गुरुवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त  पांडुरंग गोविंदराव यन्नावार पाळेकर, रा. देगलूर व भास्कर पाटील शिरूरकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. श्री.प.पू सद्गुरु नराश्याम महाराज यांनी सर्वांना दर्शन देत आशीर्वाद दिला व इच्छुक भविकांना गुरुमंत्र दिला. असंख्य तरुण भाविकांनी व्यवस्था अबाधित ठेवत भाविकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली.गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!