प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS- पहा: कोणती गावे कोणत्या जि.प.गटात व पं.स. गणात?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक : परळी तालुक्यात असे असणार जि.प.गट व पं.स.गण



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सध्या सुरू असून बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे प्रारूप प्रशासनाने तयार केले आहे. या अनुषंगाने परळी तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गणांचे प्रारूपही तयार झाले आहे.

         जिल्हा परिषदेच्या सहा गटांमध्ये व पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे याची माहिती प्रशासनाने अधिसूचनेद्वारे दिली आहे. परळी तालुक्यात आपापली गावे कोणत्या जिल्हा परिषद गटात समाविष्ट झाली आहेत हे यातून आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद गटांची प्रारूप रचना करताना काही जिप गटांची नावे बदललेली आहेत .बाकी पुर्वीएवढेच म्हणजेच सहा जि प गटांची रचना परळी वैजनाथ तालुक्यात असणार आहे.


पहा: कोणती गावे कोणत्या जि.प.गटात व पं.स. गणात?


1. सिरसाळा जि.प.गट

• पोहनेर गण :डिग्रस,बोरखेड, तेलसमुख, रामेवाडी/कासारवाडी, जळगव्हाण,हिवरा गो., जयगांव, गोवर्धन (हि),हसनाबाद/पाडोळी

• सिरसाळा गण:तपोवन, सिरसाळा, वाका,भिलेगांव,खामगांव

2.पिंप्री (बु.) जि.प.गट

• पिंप्री (बु.) गण : पिंप्री (बु.)ममदापुर, कौडगांव हुडा, श्रीकृष्ण नगर, श्रीराम नगर, कौडगांव घोडा,टाकळी आचार्य, पिंपळगांव गाढे

पांगरी गण: कौडगांव साबळा,कानडी, नाथ्रा, इंजेगांव टाकळी देशमुख, पांगरी/पांगरी तांडा/पांगरी कॅम्प, सेलू ,सबदराबाद, मलनाथपुर, मलनाथपुर नविन वस्ती, रेवली/रेवली तांडा/डांबतांडा,वडखेल/वडखेलतांडा, परचुंडी,लिंबोटा/लिंबोटा तांडा

3.मांडवा जि.प.गट 

बेलंबा गण: कौठळी,कौठळी तांडा, बेलंबा/बेलंबा तांडा, वडगाव दा.,दगडवाडी, कासरवाडी, वैजवाडी

मांडवा गण : वसंत नगर, धारावती तांडा, मलकापूर, मिरवट, नंदनज, मरळवाडी, मांडवा(प.), सारडगाव, मालेवाडी/मालेवाडी तांडा/वनवासवाडी 

4.नागापूर जि.प.गट

नागापूर गण : नागापूर, बहादूरवाडी, डाबी, डाबी तांडा,अस्वलांबा/नामानाईक तांडा/ नारायण कौलतांडा, मांडेखेल, वाणटाकळी, वाणटाकळी तांडा, दौनापूर, सोनहिवरा 

मोहा गण: वाघाळा, नागपिंपरी, कावळ्याची वाडी,मोहा,वंजारवाडी,करेवाडी,सरफराजपूर, गडदेवाडी/कामठतांडा/माधवतांडा बोधेगांव / चोपनतांडा, बोधेगांव, माळहिवरा, गोपाळपूर, तडोळी

5.जिरेवाडी जि.प.गट

टोकवाडी गण: तळेगाव, टोकवाडी, वाघबेट, संगम, दाउतपूर,जुनी थर्मल काॅलनी, ब्रह्मवाडी, इंदपवाडी/इंदपवाडी तांडा

जिरेवाडी गण: जिरेवाडी, जलालपुर, परळी ग्रामीण (प्रियानगर, शंकर पार्वती नगर, बजरंग नगर, बँक काॅलनी),भोपला, देव्हाडा, कनेरवाडी/जांभुळवाडा तांड/ गांधी तांडा, लेंडेवाडी, इंदिरानगर, मैंदवाडी/ रुपसिंग तांडा/सेवानगर तांडा,दौंडवाडी

6.धर्मापुरी जि.प.गट 

नंदागौळ गण: नागदरा, आनंदवाडी, लाडझरी, चांदापूर/चांदापूर नविन वस्ती, नंदागौळ, परळी ग्रामीण (मलिकपुरा,वडसावित्रीनगर )

धर्मापुरी गण: धर्मापुरी, भोजनकवाडी, खोडवा सावरगाव, हेळंब, हाळम, दैठणाघाट, गुट्टेवाडी


Click :बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची रचना जाहीर >>>>या लिंकवर क्लिक करून यादी डाऊनलोड करा.


-----------------------------------------------

Click:♦️ _नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय!_ > _प्रवेश अर्जासाठी केंद्र सरकारचे ओबीसी सर्टिफिकेट अनिवार्य; जाचक अटिमुळे पालकवर्ग आक्रमक_

Click:● _खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशा सर्व प्रक्रियेचा बनाव: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची तब्बल २४ लाखांची फसवणूक_

Click:■ _अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला जगाचा निरोप!_

Click:■ _मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव_

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या