MB NEWS-दखल कार्याची / अमोल जोशी.....

 पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचा ‘नगरचे जिगर’ संस्थेकडून गौरव

दखल कार्याची / अमोल जोशी.....

    समाजात सातत्याने व नि:स्वार्थ भावनेतून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांमुळे सामाजिक भान जागवणार्‍या पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टला ‘नगरचे जिगर’ आणि छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. माऊली सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार संग्राम भैया  जगताप, प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक केतन पुरी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.रविंद्र शितोळे यांच्या हस्ते ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल व  वरद लकशेट्टी यांनी हा सन्मान स्वीकारला.

कार्यक्रमात बोलताना ‘नगरचे जिगर’ संस्थेचे राजेंद्र बुलबुले यांनी सांगितले की, पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टने सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. कोविड काळात गरजू, एकटे, आजारी, वृद्ध, विधवा महिलांना सलग तीस दिवस जेवण पुरविण्याचे केलेले कार्य, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, वह्या, दप्तर यांचे वाटप, तसेच अनाथ व निराधार कुटुंबांना वैद्यकीय मदत यांसारख्या उपक्रमातून या संस्थेने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या कार्याची दखल घेवुन त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सन्मान स्वीकारताना संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास बुरगुल यांनी सांगितले की, हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही फक्त आमचे कर्तव्य पार पाडत आहोत, पण समाजाने आणि ’नगरचे जिगर’ सारख्या संस्थेने आमच्या कार्याची दखल घेतली, हे अधिक जबाबदारीची जाणीव करून देते. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत मदतीचा हात पोचवण्याचा आमचा प्रयत्न पुढेही सुरूच राहील. आम्ही कुठलाही गाजावाजा न करता केवळ सेवाभावातून काम करत आलो आहोत आणि याच तत्त्वावर आम्ही आमचे सामाजिक कार्य विस्तारत राहू.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घुले सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे प्रविण गोधडे यांनी केले. या प्रसंगी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !