MB NEWS-निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षाने न्याय द्यावा - भोजराज पालीवाल
आगमी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार - परशुराम जाधव
निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षाने न्याय द्यावा - भोजराज पालीवाल
अंबाजोगाई, प्रतिनिधी...
अंबाजोगाई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची परळी केज मतदार संघाची आढावा बैठकीत शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांनी सांगितले जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका शिवसेना सर्व टाकतीने स्वबळावर निवडणूक लढविणार
निष्ठावंत शिवसैनिकांनी कामाला लागावे. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश घेऊन आलो आहे.अंबाजोगाईच्या बैठकीत परळी मतदारसंघाचा आढावा सांगताना शिवसेना तालुका प्रमुख भोजराज पालीवाल यांनी सांगितले निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने न्याय दिला पाहिजे .
अंबाजोगाई येथे परळी व केज मतदार संघातील आढावा बैठक शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख उल्हास गिराम शिवसेना केज तालुकाप्रमुख अशोक जाधव अंबाजोगाई शहर प्रमुख आशोक हेडे अशोक गाढवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायण दादा सातपुते अंबाजोगाई चे उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी युवा सेनेचे जिल्हाधिकारी सोमेश्वर भैय्या नितीन धांडे सुशील पिंगळे परळी शहर प्रमुख राजेश विभूते केज शहर प्रमुख तात्या रोडे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक नवले ताई परळी महिला आघाडी तालुका संघटन प्रमिला लांडगे अंबाजोगाई महिला आघाडी तालुका संघटक रेखा घोबळे महिला आघाडीच्या ढाकणे वहिनी . त्याला बैठकीत परळी केज अंबाजोगाई शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा