MB NEWS
पारिजात संस्था मुंबई यांच्या कडून आय.एस.ओ.मानांकित जि.प.प्रा.शा.नफरवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
अमोल जोशी / पाटोदा
दिनांक 10 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नफरवाडी तालुका पाटोदा येथे पारिजात संस्था मुंबई यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री उत्तरेश्वर औटे तर प्रमुख पाहुणे पाटोदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय बोंदार्डे साहेब तसेच गावचे सरपंच बंडू सवासे, शिक्षणप्रेमी नागरिक सावंत सर, उपसरपंच केशव तांबे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अशोक वाघ,सदस्य बाळू ढोले,रविकांत वनवे,लहू दराडे,दगडू मंडलिक,अशोक मंडलिक,श्रीकांत बुधवंत,रवींद्र पांडव, सुभाष सवासे हे होते
कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आला.त्यानंतर बीटीएस आणि मंथन तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अण्णासाहेब खंडागळे सर यांनी केले यामध्ये त्यांनी उपस्थितांना असे सांगितले की,पारिजात मुंबई संस्थेच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जातात.या मधील बॅक टू स्कूल हा महत्वाचा आणि यशस्वी उपक्रम आहे. बॅक टू स्कूल उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या शाळेतील 115 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर School Bag आणि शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याची किट दिल्याबद्दल शाळेच्या वतीने,ग्रामस्थांच्या वतीने पारिजात संस्था मुबंई यांचे आभार तसेच ऋण व्यक्त केले.पारिजात संस्थेचे इतर उपक्रम उदाहरणार्थ वृक्षारोपण,सामाजिक वनीकरण करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने उपस्थितांना केले त्याचे वेळोवेळी अहवाल,फोटो पारिजात संस्थेला पाठवायचे आहेत अशी माहिती दिली. प्रास्ताविका नंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारिजात मुंबई संस्थेच्या वतीने देण्यात आलेले साहित्य वाटप करण्यात आले.साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खरोखरच पाहण्यासारखा होता. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाटोदा तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री धनंजय बोंदार्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय परीक्षा याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर पालकांना शिक्षणाचे महत्व विशद करताना असे सांगितले की आपल्या पाल्यांचे चांगले शिक्षण आणि संस्कार हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.त्यामुळे सर्व पालकांनी आपापल्या पाल्यांकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नफरवाडी शाळेतील शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहेत शाळा कल्पकतेतून, लोकसहभागातून,समाज सहभागातून वेगळी आणि यशस्वी वाटचाल करत आहे त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक पालक यांचे अभिनंदन केले.त्याचबरोबर पारिजात संस्था मुबंई सुगंध जगण्यातला यांनी शाळेला केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
Click:♦️ _वैद्यनाथ बँक निवडणुक : उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस; आत्तापर्यंत ४५ नामनिर्देशन अर्ज दाखल_
सदरील कार्यक्रमासाठी गावातील दत्तात्रय सवासे, संतोष वाघ,पांडुरंग तांबे,संभाजी चव्हाण,खंडू तळेकर, काशिनाथ सस्ते,काकासाहेब मंडलिक,लक्ष्मण कवडे,प्रदिप वाघ,कैलास तांबे,गणेश शिंदे,ज्ञानोबा तांबे ,किशोर तळेकर,भागवत दराडे आदी पुरुष पालक तसेच महिला पालक,शिक्षणप्रेमी नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुरूमकर सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री राऊत सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील श्रीम.काकडे मॅडम,वावरे मॅडम,ट्रेनी शिक्षक सुशील ढेरे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा