इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- हार्दिक अभिनंदन!!!!

 उपमुख्याध्यापक अरुण कांबळे यांना पीएच.डी. 

बीड: केज तालुक्यातील शिंगणी येथील मूळ रहिवासी तथा छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक अरुण लक्ष्मणराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'महात्मा फुले - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा' या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली .डॉ. डी. व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'डॉ.बाबसाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन: एक अभ्यास (1920 ते 1970 )' या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला आहे. अरुण कांबळे हे गेल्या 33 वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. ते इंग्रजी विषयाचे  राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक , लसाकम या सामाजिक संघटनेचे  राज्य प्रवक्ते आहेत . त्यांचा अनिगुत काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे . मासिक लहूशक्ती, मासिक तथागत चे  त्यांनी अनेक वर्ष  संपादन केले आहे .विविध विषयांवर अनेक वर्तमानपत्रातून  त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.   स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून आय.एस.टी. म्हणून  ते जपान  येथे 23 व्या आंतरराष्ट्रीय जांबोरी त सहभागी झाले होते. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.  26 जून रोजी नुकतेच त्यांना राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल  जय तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव गाडेकर , सचिव   रंगनाथराव जाधव  सदस्य शिवाजी देवरे, प्राचार्य  डी.एस.जाधव ,पर्यवेक्षिका बी.एस . हिवरेकर , प्रो.डॉ.दिलीप अर्जुने, प्रो.डॉ.सुनिल नरवडे , डॉ.एम.जी.सदामते, प्राचार्य कमलाकर कांबळे, प्राचार्य बी.जी. खोडवे, प्राचार्य ए. के. वाघ , एन.एम. राठोड ,एस. पि. चेपट, ए . बी. जाधव, एम.एस.रांजणीकर , किशोर गेडाम एन.जे.पठाण,मधुसूदन कांडलिकर ,सुशील कुंबेफळकर , डॉ . गणेश गावंडे, प्रा.डॉ. मारोती गायकवाड,के. ई. हरिदास, माजी न्या. डी. आर. शेळके, श्रावणदादा गायकवाड, डॉ . भारत सोनवणे,प्रा. अरुण चंदनशिवे , अँड. वसंत शेजुळ आदींनी त्यांचे अभनंदन केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!