MB NEWS- विशेष लेख✍️कु. कोमल कृष्णा गुट्टे
शांततेचा मार्ग हा सदा सर्वदा उपयोगी!
शांतता....! महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता यांचा मार्ग होता शांततेचा, ते नेहमी शांत राहिले, त्यांनीही चुकीच्या गोष्टींवर विरोध केला; परंतु शांततेच्या मार्गाने.
हाच माझा आजचा मुद्दा 'शांतता'! शांतता ही आयुष्यात प्रत्येकाच्या असायला हवी, कारण क्रोध काही कामाचा नाही एक, गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही क्रोधाने सर्व गमवाल, परंतु शांततेने सर्व मिळवाल.
महात्मा गांधींनी नेहमी स्वीकारलेला शांततेचा मार्ग, कुठल्याही आणि कसल्याही ठिकाणी स्विकारावा असाच आहे.
पहा शांत डोक्याने घेतलेला निर्णय, बोललेले शब्द, केलेला विचार, हा योग्यच असतो. असं आहे ना! तुमचा स्वभाव शांत ठेवा, तुम्ही म्हणाल आमची सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही आहे का नाही?
याच्यावर मी म्हणेल, 'जब बात सेल्फ रिस्पेक्ट पे आती है तब सब भूल जाना चाहिए!' पहिली गोष्ट तर कुणाच्या नादी लागायची आणि लागलात तर त्याला सोडायचं.....
आता म्हणाल शांत स्वभाव, आणि सेल्फ रिस्पेक्ट, how that's possible? बेटा एक बात बताओ, लोक नेहमी आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतील, तर तुम्हाला उत्तर तर द्यायचं; पण शांततेच्या मार्गाने!
पहा तुम्ही अभ्यास करता, लोक तुम्हाला म्हणतात, काय अभ्यास करून दिवे लावणार आहेस? लोक जेव्हा असं म्हणतील तेव्हा त्यांना इग्नोर करा पण उत्तर देऊ नका असं नाही, उत्तर द्यायचं पण शांतीने! कसं, एवढा अभ्यास करायचा की खरंच दिवे लावून दाखवा लोकांना! मतलब "मेहनत इतनी खामोशी से करो की, आपकी कामयाबी शोर मचा दे!"
याला म्हणतात शांततेनं उत्तर देणे! बेटा जो काटते है ना भोकते नही, और जो भोक्ते हे वो काटते नही!
जास्त काही सांगणार नाही, आत्ता फक्त एवढेच म्हणेल की इशारा काफी है समजदार को! भेटू पुन्हा अशाच लेखनातून!
✍️ कु. कोमल कृष्णा गुट्टे
वर्ग 9 वी - न्यू हायस्कूल, परळी वैजनाथ
छान लिहित रहा, कोमल बेटा!
उत्तर द्याहटवा