परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:"गुरुपौर्णिमा आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिन... संस्कारांचा संगम!"

आखिल भारतीय विद्यार्थी परिषद बीड शाखेकडून राष्ट्रीय विद्यार्थी दिन व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


अमोल जोशी / पाटोदा....

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बीड शाखेच्या वतीने ९ जुलै राष्ट्रीय विद्यार्थी दिन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे चा ७७ वा. स्थापना दिन मोठ्या बीड जिल्हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्ड देऊन राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच शासकीय ITI महाविद्यालयात "कौशल्य विकासातील संधी व उद्योजकता विकास" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. रमेश खंडागळे होते.यांनी सांगितले की आज चा विद्यार्थी हा कौशल्य पूर्ण असावा व तो नोकरी च्या मागे न पळता उद्योजक बनण्याच्या पर्यंत करणारा असावा. असे सांगत उद्योजकता विषयाचे महत्व व येणाऱ्या संधी सांगितल्या.

अभाविप स्थापना दिन आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त  बंकट स्वामी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात प्राचार्य शंकर धांडे व अभाविप स्थायी कार्यकर्ते चंद्रकांत फड यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. या वेळीय अभाविप प्रांत SFD प्रमुख प्रा. डॉ. अरुण पाटील, शहराध्यक्ष प्रा. डॉ. जगन्नाथ चव्हाण, शहर सहमंत्री आशिष वारे, राघवेंद्र कुलकर्णी, प्रद्युमन परजणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी

तसेच बीड शहरातील विविध महाविद्यालयात जाऊन प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकवृंदांना भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहर सहमंत्री आशिष वारे, राघवेंद्र कुलकर्णी, प्रद्युमन परजणे, आशुतोष रणखांबे, ऋषिकेश लाखे, सार्थक कडु व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_


अभाविप बीड शाखेकडून घेतलेल्या या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकवर्गात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील असे शहर सहमंत्री आशिष वारे यांनी सांगितले.












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!