Om namha shivay.....!!!!
नागापूर येथे श्री नागनाथ मंदिरात अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात
परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)
मौजे नागापूर येथील ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिरात श्री गुरु ष. ब्र. १०८ राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (वीरमठ, अहमदपूर) यांच्या प्रेरणेने आणि श्री गुरु ष. ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज (अंबाजोगाई) यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड शिवनाम सप्ताहाला शुक्रवार, दि. ११ जुलै २०२५ रोजी प्रारंभ झाला. या पवित्र सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी शिवकथेचे आयोजन केले होते. कथा वाचन शि.भ.प.श्री ऋषिकेश गौरशेटे (पुस) यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या सप्ताहामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायंकाळी 5 ते 6 शिवपाठ व रात्री 8 ते 10 शिव कीर्तनाचा सर्व शिवभक्तांनी लाभ घेतला दि. 16 रोजी शंकर पार्वती चा देखावा साजरा करून त्यांचा विवाह लावण्यात आला होता यावेळी वरून राजाने पण उपस्थिती लावली होती.१८ रोजी शि.भ.प.किर्तन केसरी श्री भगवंतराव पाटील चामरगा यांच्या अमृतवाणीने सकाळी 11ते 1 वा.सप्ताह ची सांगता दुपारी 1 ते 2 ष.भ्र 108 शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई यांचे आशीर्वचन झाले व नंतर महाप्रसाद झाला.यावेळी सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा