पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने 108 गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
सामाजिक वृत्त/ अमोल जोशी
अहिल्यानगर येथील पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने श्री मार्कंडेय संकुल येथे अहिल्यानगर शहरातील विविध शाळांमधील 108 गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.पुजा गुंडू, पद्मशाली सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी, इंजि.अक्षय बल्लाळ, अजय लयचेट्टी, श्रीनिवास बुरगुल, रोहित गुंडू, यश लयचेट्टी, शुभम सुंकी, राजेंद्र बुलबुले, गणेश अवधूत, बालाजी कोक्कुल, वरद लकशेट्टी, बालाजी रायपेल्ली, ओंकार आडेप, अनिकेत दुस्सा, ओंकार जेटला आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना
सौ.गुंडू ताई म्हणाल्या की, शिक्षण हीच खरी समृद्धी असून, प्रत्येक विद्यार्थ्याने मोठे स्वप्न पाहून त्याच्या पूर्ततेसाठी झटले पाहिजे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवे बळ मिळते आणि तेच आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरते. पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम कौतकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पद्मशाली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी यांनीही संस्थेच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम आयोजित केला असून, भविष्यात अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा आमचा मानस आहे. ‘देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे’ या म्हणी प्रमाणे आज पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून नगर शहरातील श्री मार्कंडेय विद्यालय श्रमिक नगर, वि.ल कुलकर्णी प्राथमिक शाळा, 108 महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालय, श्रीमती पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालय, बालक मंदिर प्राथमिक शाळा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, सिताराम सारडा विद्यालय, मनोहरलाल रामचंद्र सबलोक प्राथमिक विद्यालय, दादाचौधरी मराठी शाळा या शाळेतील 108 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले, असे सांगितले.
गेल्या 9 वर्षापासून पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. दरवर्षी 100 गरजू विद्यार्थ्यांना दप्तर आणि स्वेटर वाटप वाटण्यात येते. आतापर्यंत नऊ वर्षात 1808 विद्यार्थ्यांना दप्तर आणि स्वेटर देण्यात आले. वृक्षारोपण, रक्तदान, शिबिर मोफत आरोग्य तपासणी, दिवाळी निमित्त साडीवाटप, किराणा वाटप, महाप्रसाद भंडारा, चित्रकला स्पर्धा, गरजू रुग्णांना आर्थिक मदत, सायकल वाटप असे वर्षभरात अनेक उपक्रम राबवण्यात येतात. पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या सदस्यांकडूनच आर्थिक मदत गोळा करून हे सर्व उपक्रम राबवण्यात येतात.
यावेळी यश लयचेट्टी याने सीए परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहित गुंडू यांनी केले .तर आभार प्रदर्शन इजि.अक्षय बल्लाळ यांनी मानले.
---------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा