Vaidyanath bank election....
वैद्यनाथ बँक निवडणुक : एकूण 72 नामनिर्देशन अर्ज दाखल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., परळी वैजनाथच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे.बँकेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज(११) अखेरचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण 72 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.
१४ जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत १५ जुलै ते २९ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. अंतिम यादी व चिन्हांचे वाटप ३० जुलै रोजी होईल. मतदान १० ऑगस्टला – सकाळी ८ ते संध्या ४ वा.पर्यंत होणार आहे.१२ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होवुन निकाल लागेल.
🔹१७ जागा व संचालक जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे:
सर्वसाधारण – १२ जागा,अनुसूचित जाती – १ जागा,इतर मागासवर्गीय – १ जागा,भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग – १ जागा, महिला प्रतिनिधी – २ जागा
सविस्तर बातमी व उमेदवारांची यादी थोड्याच वेळात.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा