डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 67 वा वर्धापन दिन

मराठवाडा विकासात विद्यापीठीय शिक्षणाचा सिंहाचा वाटा - डॉ. प्रा. माधव रोडे 

      



परळी, प्रतिनिधी..... 

जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा 67 वा वर्धापन दिन 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी,डॉ माधव रोडे यांनी मराठवाड्याच्या विकासात विद्यापीठीय शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन याप्रसंगी केले. विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर,  प्रमुख पाहुणे व व्याख्याते डॉ.माधव रोडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या परिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी, डॉ  पी एल कराड, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रोफेसर डॉ.रमेश राठोड, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ रामेश्वर चाटे, इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बाबासाहेब शेप यांची उपस्थिती होती. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रमुख व्याख्याते डॉ माधव रोडे यांनी मराठवाड्याचा संपूर्ण इतिहास रेखाटत असताना त्यांनी असे म्हटले की, मराठवाडा हा पूर्वीपासूनच समृद्ध होता. कारण या मराठवाड्याला सामाजिक,सांस्कृतिक, आर्थिक धार्मिक इतिहास आहे. वेरूळ, अजिंठ येथील लेण्यामुळे मराठवाड्याच्या सांस्कृतिक इतिहासात भर पडली आहे. मराठवाडा विद्यापीठ स्थापनेच्या वेळी मराठवाड्यात बोटावर मोजण्या इतके शाळा -महाविद्यालय होती. सध्या शाळा महाविद्यालयाची संख्या भरमसाठ आहे,परंतु त्या तुलनेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे असे मत याप्रसंगी व्यक्त केले. तसेच विद्यापीठाचा लोगो विषयी इत्यंभूत अशी माहिती या प्रसंगी  दिली.अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. जे व्ही जगतकर यांनी प्राध्यापकांनी  विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास कसा करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच प्राध्यापकांनी नवनवीन संशोधनाकडे वळणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.या दिनाचे औचित्य साधून एनएसएस विभागांतर्गत माय भारत पोर्टल हा भारत सरकारचा उपक्रम महाविद्यालयात एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ.माधव रोडे व सहाय्यक डॉ. भीमानंद गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ एस ए धांडे, प्रा.सागर शिंदे, कॅप्टन प्रा गणेश चव्हाण व एनएसएसचे विद्यार्थी चि. प्रणव आघाव, आशिष मुंडे, किरण गुट्टे यांनी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची या उपक्रमात नोंदणी केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे.व्ही. जगतकर, विद्या परिषद सदस्य डॉ. पी एल कराड, एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. माधव रोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार   डॉ.बी एस सातपुते यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व     शिक्षकेत्तर  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !