सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब

 वैद्यनाथ बँकेसोबतचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलला विजयी करा






मा.खा.प्रितम मुंडे यांचे वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड येथील सभासदांना आवाहन


सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब


बीड। दि ०४ । वैद्यनाथ सहकारी बँक ठेवीदार, सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाला सार्थ ठरवणारी बँक आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात बँकेचा लौकिक वाढला आहे. बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. आर्थिकदृष्ट्या बँक अत्यंत सक्षम आहे. बँकेसोबतच नात अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेच्या सभासदांना केले.


वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड येथे आयोजित सभासदांच्या मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रितमताई मुंडे बोलत होत्या. वडवणी येथे मा.आ. केशवराव आंधळे यांच्यासह सभासद, व्यापारी,पदाधिकारी, गेवराई येथे आ. विजयसिंह पंडित, सर्व पदाधिकारी, व्यापारी आणि माजलगाव, बीड येथे भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी या मेळाव्यांना उपस्थित होते. तसेच यावेळी उमेदवार सर्वश्री विनोद सामत, रमेश कराड, प्रकाश जोशी, मनमोहन कलंत्री,संदीप लाहोटी, महेश्वर निर्मळ, विजय वाकेकर, अमोल दुबे, कुलभूषण जैन, सुशांत लोमटे हे देखील उपस्थित होते.


वैद्यनाथ सहकारी बँक अनेक दशकांपासून ठेवीदार, सभासदांच्या विश्वासाचे जतन करत आहे. तसेच गरजू लोकांना बँकेने अडचणीच्या काळात वेळोवेळी वित्त पुरवठा केला आहे. सर्वांच्या सहकार्याने बँक आजमितीस सहकार क्षेत्रात आपला लौकिक वाढवत आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत बँकेच्या प्रतिष्ठेला शोभेल असे मताधिक्य लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना दया, निश्चित पुढील काळात पूर्वीपेक्षा अधिक लक्ष देऊन सभासदांच्या सूचनांची अंमलबजावणी करेल असा विश्वास प्रितमताई मुंडे यांनी उपस्थितांना दिला.


*ना.पंकजाताईंच्या आश्वासक नेतृत्वात बँकेची प्रगती विमानाच्या गतीने होत राहील*


वैद्यनाथ सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत सभासद ना. पंकजाताई मुंडे यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत. मागील दहा वर्षांच्या काळात पंकजाताई मुंडे यांच्यावर सभासदांनी विश्वास टाकला आणि बँक पूर्वीपेक्षा अधिक भक्कम झाली. यापुढेही बँकेचा विकास हा विमानाच्या गतीने होणार आहे, येणाऱ्या १० ऑगस्ट रोजी सभासदांनी आपले अमूल्य मत ‘विमान' या चिन्हाला द्यावे, पंकजाताईंच्या नेतृत्वात आपल्या हक्काच्या बँकेच्या विकासाला निश्चित विमानाची गती देऊ असा विश्वास यावेळी डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सभासदांना दिला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !