माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ६२ दात्यांचे रक्तदान !

रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......

       परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज (दि.११) रोजी आयोजित रक्तदान शिबिराला  दरवर्षी प्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या  शिबिरात तब्बल ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

       राज्याचे माजीमंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचा शुभारंभ डॉ. जे. जे. देशपांडे, डॉ. सुरेशचंद्र चौधरी,शरदराव कुलकर्णी,वैजनाथराव सोळंके,आयुबभाई पठाण, अमर देशमुख, डॉ. विनोदजी जगतकर, अनंत इंगळे, श्रीकांत मांडे,राजेंद्र सोनी, रमेश चौंडे,अनिल अष्टेकर, के.डी. उपाडे महेंद्र रोडे, दत्ताभाऊ सावंत,संजय देवकर महावीर महालिंगे, अजय जोशी प्रा.शामसुंदर  दासूद सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.हे रक्तदान शिबिर परळीत गावभागाची एक सामाजिक दायित्वाची परंपरा बनली आहे.          

        दरवर्षी वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 12 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारे व मोठ्या सहभागाचे शिबीर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे. यावर्षीही या शिबिरात रक्तदात्यांची उत्स्फूर्तता मिळाली. 

         स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील पथकाने  या शिबिरात रक्तदान प्रक्रिया पार पाडली.या शिबिरात तब्बल ६२ रक्तदात्यांनी रक्तदान  केले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !