परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संभाजी मुंडे, बालासाहेब फड व नितीन ढाकणे यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!

टिव्ही 9मराठीचे रिपोर्टर संभाजी मुंडे व संपादक बालासाहेब फड,संपादक नितीन ढाकणे यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर


रविवारी होणार नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक( प्रतिनिधी) न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित वर्धापन दिन निमित्त  वंजारी समाजरत्न पुरस्कार 2025 चा टिव्ही 9मराठीची संभाजी मुंडे तसेच दै. सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड व दै. अतुल्य महाराष्ट्र चे संपादक नितीन ढाकणे यांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून श्री मुंडे व फड यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

      न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित वर्धापन दिन निमित्त  वंजारी समाजरत्न पुरस्कार 2025चेआयोजन रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता  संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजा गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री  धनंजय मुंडे  , माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे ,माजी आ. गोविंद केंद्रे, ह भ प डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, अनिल गर्जे, .कोंडाजी आव्हाड, उद्योजक बुधाजी  पानसरे, माजी मंत्री खा. भागवत कराड,मोहन  घुगे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प प्रकाश महाराज साठे, ह भ प सोपान महाराज शास्त्री आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

     बीड जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियातील एक नावाजलेले नाव म्हणजे संभाजी मुंडे अगदी सुरुवातीच्या काळात आपल्या ग्रामीण भागाच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मिडिया तुरळक बातम्या प्रसारित करत होता तेव्हा पासून आज तागायत इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये सुरुवातीला कॅमेरामन म्हणून ओळख आणि आता थेट टिव्ही 9मराठी या माध्यमाच्या प्रतिनिधी म्हणून केले काम आपल्या पत्रकारिता क्षेत्रात संभाजी मुंडे यांनी समाजावर होणारे अत्याचारा विरुद्ध प्रसिद्ध, न्यायाच्या भावनेतून केलेली पत्रकारिता याचीच दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

     तर गेल्या अनेक वर्षापासून परळी सारख्या भागात दैनिक सोमेश्वर साठी हे दैनिक चालवत विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे बालासाहेब फड हे सर्व परिचित नाव आहे परळी व पंचक्रोशी मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून परळी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे सर्वांना सहकार्य व सर्व समावेशक व्यक्तिमत्व म्हणून संपादक बाळासाहेब फड यांची ओळख आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

      तसेच दैनिक अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे यांचाही या सोहळ्यात समाज रत्न पुरस्काराने गौरव होणार आहे नितीन ढाकणे हे परळीतील युवा संपादक म्हणून कार्यरत असून सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसरपणाने काम करतात युवा संपादक म्हणून त्यांनी परळीत आपले वेगळे छाप प्रस्थापित केले आहे एक सकारात्मक संयमी व सुसंस्कृत पत्रकार अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे यापूर्वीही त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

     परळीतील या सर्व परिचित पत्रकारांना वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या योग्य निवडीचे सर्व स्तरावर स्वागत होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!