श्रमानेच उध्दार या गिताला बक्षीस

समुह गायन स्पर्धेत परळीच्या संघाला  द्वितीय पारितोषिक 




सर्वोत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली 

श्रमानेच उध्दार या गिताला बक्षीस 

परळी (प्रतिनिधि) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय समुह गायन स्पर्धेत परळीच्या संघाला द्वितीय पारितोषिक मिळाले.


क्रांतीदिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतिने समुह गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लातूर येथील कामगार कल्याण भवनात शनिवार या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत परळीच्या समुह गायन संघास द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण विवेकानंद रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. राधेश्याम कुलकर्णी, प्रा. शिवानंद पटवारी, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस,  प्रा. ज्योती डोंगरे, संतोष धाराशिवकर, जनार्दन तळीखेडे यांच्या हस्ते झाले. समुह गायन संघात कपील चौधरी, पांडुरंग काकडे, वैष्णवी सावजी, राधिका बजाज, नेतल शर्मा, अवनी जोशी, आरती चौधरी, सरस्वती मुंडीक, श्रीलेखा कांबळे, सेजल कराड, राशी रामदिनलवार, सुनिता सावजी यांचा सहभाग होता.हे सर्व विद्यार्थी विदेह संगीतालय भक्ताश्रम गणेश पार या प्राचीन परंपरा जपणाऱ्या संगीतालयात संगीत शिक्षण घेतात. श्री गणेश (अण्णासाहेब) चौधरी यांचे ते  प्राचीन परंपरा लाभलेले संगीतालय हे कपिल रमेशचंद्र चौधरी  पाहतात. श्रमानेच उध्दार हे कामगारांच्या श्रमावर आधारीत गित सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरेफ शेख यांनी केले तर आभार संगमेश्वर जिरगे यानी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !