सोळा वर्षीय युवतीचा आईसमोर विनयभंग
परळी (प्रतिनिधी)
मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत कपडे घेण्यासाठी आईसोबत घराबाहेर निघालेल्या सोळा वर्षीय युवतीचा आईसमोर विनयभंग करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आझादनगर भागातील एकाविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील आझादनगर भागातील १६ वर्षीय युवती दि.२६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कपडे घेण्यासाठी आईसोबत निघाली असता शेख सोहेल जमील याने दोघींना अडवत मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणुन आईस शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात शेख सोहेल जमील रा.आझादनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि जाधवर हे करत आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा