अचानक आलेल्या पुरात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
परळी वैजनाथ
शहरातील बरकत नगर भागातील रहिवासी अमेर अजमेर पठाण हा युवक शनिवारी (ता.१६) नेहमी प्रमाणे बांधकामांवरील मिक्सर चालवण्यासाठी तालुक्यातील पांगरी येथे गेला असता बंधाऱ्यावरील वाॅल बांधकाम करत असताना अचानक आलेल्या पुरात वाहून गेला व त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बरकत नगर भागातील शाहरुख अजमेर पठाण यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार अमेर अजमेर पठाण हा युवक बांधकामांवरील मिक्सरचा ऑपरेटर म्हणून काम करत असे. शनिवारी पांगरी येथील बंधाऱ्याच्या वाॅलचे काम करण्यासाठी गेला असता काम करत असताना बंधाऱ्याला अचानक पुर आला या पुरात तो वाहून गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा