तुफान पाऊस....... पर्जन्यसंकट
परळी तालुक्यातील चार युवक पाण्यात गेले वाहून
कौवडगाव (ता. परळी) | सकाळी 8 वाजता मिळालेली माहिती : पाण्यात अडकलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा जीव वाचवण्यात यश; एकजण अद्यापही बेपत्ता
कौवडगाव (ता. परळी) येथे काल उशिरा पाण्यात अडकलेल्या चार तरुणांपैकी तीन तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, बल्लाळ नावाचा एक तरुण अद्यापही बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, अमर पौळ या तरुणाला तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर राहुल पौळ आणि नवले यांनाही प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुखरूप वाचवण्यात आले. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक व नागरिकांचा सक्रिय आहे. सध्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे शोधमोहीमेस अडथळे येत असून, बल्लाळ याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
सविस्तर बातमी लवकरच....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा