अशी असणार परळीतील प्रभागरचना.....
परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या प्रभागांचे असे असणार प्रारुप ;अधिसूचना जारी ,हरकती व आक्षेप नोंदवा !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या प्रभागांचे प्रारुप प्रशासनाने एका अधिसूचननने जारी केले असुन अधिसूचनेद्वारे परळी वैजनाथ नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात येईल. याबाबत नागरिकांनी हरकती व आक्षेप नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास मुख्याधिकारी, परळी वैजनाथ नगरपरिषद यांचेकडे दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात, या तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
अशी आहे प्रारुप अधिसूचना
--------------------
परळी वैजनाथ नगरपरिषद बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे-
एकूण सदस्यांची संख्या -३५
दोन सदस्यीय प्रभागांची संख्या १६
तीन सदस्यीय प्रभागांची संख्या ०१
एकूण प्रभागांची संख्या- १७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा