खिशातील चिठ्ठीतून होणार उलगडा....!
न्यायालयातच सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या ; घटनेने न्यायालयीन परिसरात खळबळ
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी भेट देत केली पाहाणी
वडवणी/ प्रतिनिधी
वडवणी न्यायालयीन क्षेत्रात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयातील सरकारी वकील ॲड. विनायक चंदेल (वय अंदाजे ४५ वर्षे) यांनी सहा.अभियोक्ता कार्यालयाच्या खिडकीला शालच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही घटना आज सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वडवणी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मयत वकिलाच्या खिशातून पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. मात्र त्या चिठ्ठीमध्ये नेमका काय मजकूर आहे हे अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेऊन तपासाची दिशा पुढील दिशा ठरणार आहे.
मयत ॲड. विनायक चंदेल यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण न्यायालयीन परिसरात तसेच वकिली व्यवसायात मोठी खळबळ उडाली असून, याघटने मागचे नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वडवणी पोलिसांकडून सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा